PDCC Election : 30 वर्षानंतर देखील जिल्हा बँकेसाठी अजित पवारच इच्छुक

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (PDCC) संचालक पदाची निवडणूक येत्या काही दिवसांत होत आहे. त्यासाठी पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारच इच्छुक असल्याचे दिसत आहे. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सातवेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भुषवला आहे.

त्यानंतर आता 30 वर्षानंतर देखील अजित पवार जिल्हा बॅंकेत जाण्यास इच्छुक आहेत. अजित पवारांनी बारामती (Baramati) तालुक्यातून अ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अजित पवार यांच्या वतीने सुचक, अनुमोदकांनी अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान, निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 31 जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. या निवडणुकीसाठी 6 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटी तारीख आहे. गेल्या अनेक वर्षापासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अजित पवार यांची एकहाती सत्ता आहे. यावेळी आता काही उलटफेर होतात की पुन्हा एकदा अजित पवारच बँकेची धुरा सांभाळतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

हे देखील पहा