Telangana : अभाविपचे पूर्व कार्यकर्ते रेवंत रेड्डी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार?

Election Result 2023 Live : मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगण या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच, आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगानं मिझोरम विधानसभेच्या मतमोजणीच्या वेळापत्रकात बदल केल्यानं तिथं आज ऐवजी उद्या मतमोजणी होणार आहे.

समोर येत असलेल्या माहितीनुसार, भाजपने राजस्थानात,मध्य प्रदेशात मोठी आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, एक्झिट पोलने छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या विजयाचा अंदाज वर्तवला होता. परंतु सध्याच्या ट्रेंडवरून भाजप काँग्रेसपेक्षा पुढे आहे. तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे स्पष्ट होऊ लागताच तेलंगणामधील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. या दरम्यान रेवंत रेड्डी यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

महबूबनगर जिल्ह्यातील कोंडारेड्डी पल्ली येथे जन्म झालेले ५४ वर्षीय रेवंत यांचे पूर्ण नाव अनुमुला रेवंत रेड्डी असे आहे. उस्मानिया विद्यापीठातून पदवी मिळवताना त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)मधून महाविद्यालयीन राजकारणात पाऊल ठेवले. २००६ साली त्यांनी जिल्हा परिषदेसाठी अपक्ष निवडणूक लढविली आणि ती जिंकलीही. पुढच्याच वर्षी २००७ साली आंध्र प्रदेशच्या विधान परिषदेवर अपक्ष म्हणून निवडून आले.

आंध्र प्रदेश विधान परिषदेत काम करताना २००९ साली रेड्डी यांनी टीडीपीच्या तिकिटावर कोंडगल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे मातब्बर आमदार गुरुनाथ रेड्डी यांचा पराभव केला.

२०१४ साली त्यांची काँग्रेसशी जवळीक साधली. त्यामुळे संतापलेल्या नायडू यांनी २०१७ साली त्यांची विधिमंडळ पक्षनेता पदावरून हकालपट्टी केली. काही दिवसांनंतर रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आणि २०१८ साली पराभव झाल्यानंतरही रेवंत रेड्डी यांनी संघटनेमध्ये पूर्ण ताकदीने काम केले. २०१९ साली काँग्रेसने त्यांना मल्काजगिरी या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (आता भारत राष्ट्र समिती) उमेदवाराचा पराभव करीत पहिल्यांदाच लोकसभेत प्रवेश केला. काँग्रेसला जर बहुमत मिळाले, तर रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती असतील, अशी अटकळ अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनीही रेवंत रेड्डी यांच्या नावाला पसंती दिली आहे.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार