आमच्यावर जो राग आहे, तो मुंबईवर काढू नका, मुंबईला तरी धोका देऊ नका – आदित्य ठाकरे 

 मुंबई – मुंबईतील मेट्रो कारशेड आरेतच (Aarey Colony) बनवण्याचा निर्णय नवनिर्वाचित शिंदे सरकारनं घेतला आहे. या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी मोठा विरोध दर्शवला आहे. आता याच मुद्द्यावर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी भाष्य केले करत शिंदे सरकारला खडेबोल सुनावले आहेत.

आमच्यावर जो राग आहे, तो मुंबईवर काढू नका. मुंबईला तरी धोका देऊ नका, आम्हाला दिलं ते खूप झालं. सरकारचा पहिला निर्णय हा मुंबईवर घाला घालणारा नसू शकतो, मुंबईचा धोका नसू शकतो. माझी हीच विनंती आहे की मुंबईकरांचा विचार करा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निर्णय रद्द करून कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो 3’चं कारशेड आरेतच उभारण्याची घोषणा नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी केल्याने हा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत. कारशेड आरेमध्येच करण्यास सरकार तयार असल्याची भूमिका न्यायालयात मांडण्याची सूचना राज्याच्या महाधिवक्त्यांना देण्यात आली आहे.