रेशीम उद्योगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शासकीय योजना नेमकी काय आहे ?

अटी व शर्ती –

-किमान अर्धा एकर जमीन – पाण्याची निचरा होणारी, बारमाही पाण्याची सोय
– तुती लागवड, किटक संगोपन साहित्य व पक्के आदर्श किटक संगोपन गृह बांधण्याची क्षमता.
– शेतकरी प्रकल्प, समुहातील असावा.

मनरेगाअंतर्गत लाभार्थी निवड प्रवर्ग
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, भटक्या विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, महिला प्रधान कुटूंबे, शारीरीक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे, भुसूधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, अनुसूचित जमातीचे परांपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता २००६) नुसार पात्र व्यक्ती, अर्धा एकर ते २ हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी.

सोईसवलती
– शासनामार्फत पुरवठा केलेल्या अंडीपुंजांना ७५ टक्के अनुदान.
-वर्षभरात ८०० पर्यंत अंडीपुंजांना अनुदान.
-बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कोष विक्री केंद्रात विक्री केलेल्या आणि सीएसआर जातीच्या कोषांना ३०० रुपयांपर्यंत भाव न मिळाल्यास सदरचे अनुदान.
-२०२२-२३ मध्ये एक एकरासाठी मनरेगा अंतर्गत ३ लाख ३९ हजार रुपये अनुदान ३ वर्षात विभागून व यापैकी किटक संगोपन गृहासाठी एका वर्षात १ लाख १ हजार २०० रुपये अनुदान.
– मनरेगा योजनेत पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना सिल्क समग्र २ योजनेतून अनुदान देण्यात येणार.अधिक माहितीसाठी संपर्क: जिल्हा रेशीम कार्यालय, २४ ब, नवीन शिवाजी नगर बसस्थानक शेजारी, शिवाजीनगर, पुणे -३ (०२०-२५८१४४८३)