दारू पिऊन जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवले; आमिरच्या तिसऱ्या पत्नीने केला घटस्फोटासाठी अर्ज 

कराची – आमिर लियाकत हा पाकिस्तानचा प्रसिद्ध टीव्ही प्रेझेंटर आहे. याशिवाय, तो पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्ष तेहरीक-ए-इन्साफचे सदस्य आहे. आमिर लियाकत हा इम्रान खानचा जवळचा मानला जातो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. मात्र आता त्याची पत्नी  दानियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लियाकतसोबतच्या तिच्या वैवाहिक आयुष्याविषयीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने लियाकतवर अत्याचार आणि ओलीस ठेवल्याचा आरोप केला आहे.

दानिया म्हणाली,लियाकतने तीन-चार दिवस एका खोलीत कोंडून ठेवले आणि  काहीही खायला दिले नाही.लियाकतने गळा दाबून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही दानियाने केला आहे. याशिवाय दानियाने आमिर लियाकतवर दारू पिऊन जबरदस्तीने अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोपही केला आहे. दुसरीकडे लियाकतने दानियाने केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे फेटाळून लावले आहे. लियाकत यांचे म्हणणे आहे की, त्याच्यावर लावलेले सर्व आरोप निराधार आहेत.

18 वर्षीय दानिया आणि 49 वर्षीय लियाकत यांचा विवाह यावर्षी फेब्रुवारीमध्ये झाला होता. दोघांच्या वयात जवळपास ३१ वर्षांचे अंतर आहे.आमिर लियाकतचे हे तिसरे लग्न आहे. याआधीही त्यांनी दोनदा लग्न केले आहे. पण दोन्ही वेळा त्यांचे लग्न कोणत्या ना कोणत्या कारणाने तुटले. आता त्याच्या तिसऱ्या लग्नावरही संकटाचे ढग दाटून आले आहेत. आमिरच्या सध्याच्या पत्नीने न्यायालयात दाखल केलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर पुढील सुनावणी ७ जून रोजी होणार आहे.