आता लोक काय म्हणतील याची भीती नाही… अश्विन 100 व्या कसोटीनंतर असं का म्हणाला?

India vs England Ravichandran Ashwin : भारत आणि इंग्लंड यांच्यात धरमशाला येथे झालेल्या मालिकेतील शेवटचा सामना रविचंद्रन अश्विनचा 100 वा कसोटी सामना आहे. या सामन्यात अश्विनने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या. त्यानंतर ऍश अण्णाने दुसऱ्या डावात 5 विकेट घेत 100 वा कसोटी सामना स्वत:साठी संस्मरणीय बनवला. त्याने इंग्लंडविरूद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत तब्बल 26 विकेट्स घेतल्या आहेत.

या कामगिरीनंतर अश्विनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, ‘संपूर्ण मालिकेत मी वेगवेगळ्या शैलीने आणि वेगवेगळ्या वेगाने चेंडू टाकला. भारत हा वैविध्यपूर्ण आहे त्यामुळे प्रत्येक मैदानावर वेगळं आव्हान असतं. लोकांना माझ्याबद्दल काय वाटतं याचा आता मला फार फरक पडत नाही.’

तो पुढे म्हणाला की, ‘मला विश्वास आहे की मी काही ना काही नवीन आजमावून पाहत आहे. मी त्याबाबतीत मागे हटणार नाही. मी चांगल्या फिडबॅकसाठी माझे कान आणि डोळे सतत उघडे ठेवतो. जोपर्यंत मी नव्या गोष्टी आजमावून पाहणार नाही तोपर्यंत मी शिकणार नाही. एकाच शैलीला चिकटून राहणं काम करत नाही अस मी म्हणणार नाही. मात्र माझ्यासाठी प्रयोग करणं आणि शिकणं कायम फायदेशीर ठरलं आहे.’

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर