Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश 

Congress | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप दक्षिण भारतात आपली स्थिती मजबूत करण्यात व्यस्त आहे. या संदर्भात भाजपने दक्षिण भारतातील अन्य पक्षांच्या नेत्यांवर विजय मिळवण्यासाठी आपला प्रचारही तीव्र केला आहे. त्याचवेळी अनेक काँग्रेसचे नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

काँग्रेसचे (Congress) दिवंगत नेते आणि केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपाल (Padmaja Venugopal) यांनी गुरुवारी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. पद्मजा यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे केरळचे प्रभारी प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) आणि राष्ट्रीय सचिव अरविंद मेनन आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीत भाजपचे सदस्यत्व घेतले.

दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना वेणुगोपाल म्हणाल्या की, मी भाजपमध्ये प्रवेश करताना खूप आनंदी आहे.  आपल्या तक्रारींवर चर्चा करण्यासाठी अनेक वेळा काँग्रेसची भेट घेतली होती. नेतृत्वाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण वेळ दिला नाही. प्रत्येक पक्षात कणखर नेतृत्व असले पाहिजे. काँग्रेसमध्ये नेतृत्व नाही. मी सोनियाजींचा खूप आदर करते, पण मी त्यांना भेटू शकले नाही. त्यांनी भेटायला वेळ दिला नाही.

यापूर्वी केरळचे माजी मुख्यमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी भाजपमध्ये दाखल झाला होता. अनिल यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केरळमधील पथनमथिट्टा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. ते भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेही आहेत. पद्मजा यांनी मुकुंदापुरम (आता चालकुडी) येथून 2004 ची लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

दिवंगत करुणाकरन आणि मुलगा मुरलीधरन यांनी 2004 मध्ये काँग्रेस सोडली आणि डेमोक्रॅटिक इंदिरा काँग्रेस (करुणाकरन) ची स्थापना केली, परंतु पक्ष कोणताही प्रभाव पाडू शकला नाही. 2007 मध्ये ते काँग्रेसमध्ये परतले. त्यांना पक्षात परत आणण्यात पद्मजा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे बोलले जाते. पण पद्मजा यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अडचणींचा सामना करावा लागला. पद्मजा यांनी 2016 आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकाही लढवल्या होत्या, पण दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता.

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा