Rohit Sharma Retirement : …तर मी थेट निवृत्ती घेईन! कर्णधार रोहित शर्माने दिली मोठी हिंट

Rohit Sharma Retirement: भारताने इंग्लंडविरुद्धच्या धर्मशाला कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील 5 व्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने एक डाव आणि 64 धावांनी विजय मिळवला. या संपूर्ण मालिकेत इंग्लंडच्या संघाविरुद्ध रोहित शर्माचे नेतृत्व उत्कृष्ट ठरले. दरम्यान, सामना संपल्यानंतर रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

निवृत्तीवर कॅप्टन रोहित काय म्हणाला?
धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यातील विजयानंतर कर्णधार रोहित शर्माने जिओ सिनेमाशी बोलताना आपल्या निवृत्तीबाबत वक्तव्य केले आहे. तो क्रिकेटमधून कधी निवृत्त होणार? हे त्याने सांगितले आहे.

तो म्हणाला की जर एखाद्या दिवशी मला जाग आली आणि मला समजले की मी चांगले क्रिकेट खेळत नाही तर मी क्रिकेटपासून दूर जाईन. गेल्या 2-3 वर्षांत मी माझ्या खेळात सुधारणा केली आहे, असे मला वाटते. रोहित शर्माच्या या वक्तव्याने करोडो चाहत्यांची मने तुटली आहेत. रोहित शर्माचे हे शब्दही खरे आहेत, तो गेल्या काही वर्षांपासून खूप चांगले क्रिकेट खेळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर