Sudhir Mungantiwar | तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर

Sudhir Mungantiwar | भाजपाने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली असून त्यात नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नसल्याने उद्धव ठाकरे यांनी त्यांना महाविकास आघाडीत येण्याचा सल्ला दिला होता. यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) थेट ऑफर देताना सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले, “त्यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान देतो. भाजपात या, तुम्हाला निवडून आणू आणि सन्मानाचं पद देऊ. मी आत्महत्या करेन पण भाजप सोडणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरे  अशा प्रकारची विधान करुन संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर त्यांनी विचार करावा. गडकरी राष्ट्रीय संपत्ती आहेत. सर्वपक्षीय नेते त्यांचं कौतुक करतात. उद्धव ठाकरेयांनी तसं करू नये”.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा