शरद पवारांनाही इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची आवड; म्हणाले, “त्यांचे कीर्तन ऐकायची इच्छा होती”

पुणे- आपल्या खुमासदार शैलीत कीर्तन करत जनसागराला हसवणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना कोण ओळखत नाही. कै. बाळासाहेब दादा पासलकर यांच्या पुण्यस्मरणनिमित्त निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawr) उपस्थित होते. मात्र दिल्लीला जाण्यासाठी काल रात्रीची फ्लाइट असल्याने त्यांना कार्यक्रममध्येच सोडून जावं लागलं. मात्र, आपल्याला इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकायला आवडते आणि वेळ काढून पुढे नक्की त्यांचे कीर्तन ऐकेन, असा विश्वास शरद पवारांनी (Sharad Pawar On Indurikar Maharaj) व्यक्त केला.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

‘दिल्लीमध्ये उद्या अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी सुरू होत आहे. हिवाळ्याच्या वातावरणामुळे सकाळचे फ्लाइट कॅन्सल होतात. म्हणून घाईगर्दीत मला आताच निघावं लागेल. नाही तर मला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. मी अनेकदा ते टीव्हीवर पाहात असतो. याची अॅक्शन कर, त्याची दिशा काढ, त्यांची टाळ, नृत्य बदल. आता सागळ्या गोष्टी सांगत नाही’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

‘पण एक जनमाणसांमध्ये सहजपणे चांगले संस्कार कसे करता येईल, सहज विचार कसे राबवता येतील? याचं उत्तम उदाहरण कीर्तनकार इंदुरीकर महाराज. आणि याचं लोणी महाराष्ट्रमध्ये सामान्य माणसांपर्यंत पोहचलं आहे. आजही या ठिकाणी मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण त्याचा लाभ मी पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही’, असं शरद पवार यांनी सांगितलं.