Mangaldas Bandal | शिरुरमध्ये तिहेरी लढत, वंचितकडून दोन वर्षे जेलवारी झालेल्या मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर

Mangaldas Bandal | प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या अध्यक्षतेखालील वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी त्यांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत नांदेड, परभणी, औरंगाबाद, शिरूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. शिरूर येथून वंचितने मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता शिरूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट (अमोल कोल्हे), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (शिवाजीराव अढळराव पाटील) आणि वंचित अशी तिहेरी लढत पाहायला मिळू शकते.

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांना 26 मे 2021 ला पोलीसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुढची दोन वर्षे मंगलदास बांदल तुरुंगात बंद होते. त्याआधी पुण्यातील एका सराफ व्यावसायिकाच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्पाय कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण करून त्या सराफ व्यावसायिकाला पन्नास कोटी रुपयांना ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून देखील मंगलदास बांदल यांना आधी अटक करण्यात आली होती. मंगलदास बांदल यांच्यावर पुण्यातील रांजणगाव एम आय डी सी परिसरात खंडणी आणि अपहरणाचे अनेक गुन्हे नोंद आहेत.

मंगलदास बांदल हे यांनी 2009 ला भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढवली होती. त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. तर त्याआधी ते अपक्ष उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. 2019 ला त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha 2024: वंचित बहुजन आघाडीची तिसरी यादी जाहीर, पुण्यातून वसंत मोरेंना दिली उमेदवारी

Murlidhar Mohol | विकसित भारताच्या उभारणीसाठी कामगारांचे, श्रमजीवींचे योगदान महत्वाचे : मुरलीधर मोहोळ

Shirur LokSabha 2024 | शिरुर लोकसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांची प्रभात फेरीद्वारे मतदान जनजागृती