T20 विश्वचषकासाठी ‘हे’ 4 गोलंदाज आहेत झहीरचे फेव्हरेट; आवेश-मुकेशचा पत्ता कट

2024 T20 World Cup: भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानने (Zaheer Khan) आगामी T20 विश्वचषकासाठी चार सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. मात्र, त्यांनी तरुण आवेश खान आणि मुकेश कुमार यांची नावे घेतलेली नाहीत.

2024 टी-20 विश्वचषक 1 जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिका (यूएसए) मध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. रोहित शर्मा या स्पर्धेत टीम इंडियाची कमान सांभाळू शकतो.

दरम्यान, भारताचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानने आगामी T20 विश्वचषकासाठी चार सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. मात्र, झहीरने यापूर्वी भारताकडून खेळलेल्या दोन युवा गोलंदाजांची नावे घेतलेली नाहीत.जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांची टी-20 विश्वचषक संघातील जागा निश्चित झाल्याचे झहीरचे मत आहे. त्याचवेळी त्याने आपल्या चार वेगवान गोलंदाजांमध्ये आवेश खान आणि मुकेश कुमारचा समावेश केला नाही.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

याशिवाय झहीर खानने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात चमक दाखवणाऱ्या मोहम्मद शमीचे कौतुक केले. तो म्हणाला की मला विश्वास आहे की शमी विश्वचषक संघाचा एक भाग असेल आणि तो भारतासाठी एक्स फॅक्टर देखील सिद्ध होऊ शकतो. बुमराह, सिराज आणि शमी व्यतिरिक्त झहीर खानने 2024 टी-20 विश्वचषकासाठी अर्शदीप सिंगची देखील निवड केली आहे. आगामी विश्वचषकात हे चार वेगवान गोलंदाज स्थान देण्यास पात्र आहेत, असे त्याचे मत आहे.

BCCI ने 2024 च्या T20 विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ अद्याप निवडलेला नाही. मात्र, विश्वचषकासाठी भारतीय संघात तीनच फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांची निवड होणार हे निश्चित, कारण हार्दिक पांड्याही वेगवान गोलंदाजाची भूमिका बजावू शकतो.

महत्वाच्या बातम्या-

राम मंदिर होतंय याचा आनंद; मांस विक्री करणार नाही; कुरेशी समाजाचा निर्णय

Facebook Scam: महिलेला गरोदर करण्याचे 10 लाख रुपये मिळतील… या गर्भधारणेच्या घोटाळ्याला बळी पडू नका!

दोन भावांनी राम मंदिरासाठी बनवला सोन्या-चांदीचा झाडू, लवकरच अयोध्येला पाठवणार