World Cup: ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सलामी जोडी कमजोर पडणार? प्रशिक्षक द्रविड यांनी दिली महत्त्वाची माहिती

Shubman Gill Health Update: भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिलला विश्वचषकातील (ODI World Cup 2023) भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी डेंग्यू पॉझिटिव्ह (Dengue Positive) आला आहे. गिलची तब्येत बिघडल्याने अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, गिल विश्वचषकातील भारताच्या पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात सहभागी होणार नाही.

आयसीसीच्या अहवालानुसार, प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी गिलच्या दुखापतीबाबत अपडेट दिले. ते म्हणाले, आज त्याला नक्कीच बरे वाटत आहे. वैद्यकीय पथक दररोज देखरेख करत आहे. आमच्याकडे 36 तास आहेत. त्याच्यावर वैद्यकीय उपचार तर सुरु आहेतच पण अद्याप त्याला संघाबाहेर ठेवण्यावर आम्ही विचार केलेला नाही. आम्ही दररोज त्यांचे निरीक्षण करत राहू. परवा त्याला कसे वाटते ते आपण पाहू.

गिल हा 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने 20 सामन्यांच्या 20 डावात 72.35 च्या सरासरीने 1230 धावा केल्या आहेत ज्यात 5 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत तो विश्वचषकात भारतासाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. भारतीय संघ विश्वचषकातील पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. आता या सामन्यात गिलचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

राहुलजींच्या केसाला धक्का लावला तर ‘सळो की पळो करुन सोडू’ – Nana Patole

खलिस्तानचा आणि चीनचा बागुलबुवा येत्या निवडणुकीत दाखवला जाणार आहे : P. Sainath

मुख्यमंत्री Eknath Shinde यांनी अखेर घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा