संभाजीनगर, धाराशिवसाठी केंद्रातून महिन्यात मंजुरी मिळवा, अन्यथा फिरु देणार नाही; खैरेचा इशारा 

Mumbai – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज कॅबिनेट बैठक (Cabinet Meeting) घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

दरम्यान, या निर्णयाने शिवसेनेला चांगल्याच मिरच्या झोंबल्याचे दिसत आहे. यासंदर्भातला ठराव विधानमंडळ मंजूर करेल आणि त्यानंतर ते केंद्राकडे मान्यतेसाठी आम्ही पाठवू. त्याचा पाठपुरावा करून ते देखील आम्ही लवकरात लवकर मंजूर करून घेऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं असून सुद्धा शिवसेनेकडून खुसपट काढले जात असल्याचे दिसून आले आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. माध्यमांशी बोलताना चंद्रकांत खैरे म्हणाले, श्रेय घेण्यासाठी शिंदे सरकानं आमच्या निर्णयाला स्थगिती दिली होती, पण टीकेनंतर त्यांना पुन्हा हा निर्णय घ्यावा लागला. 1988 पासून आम्ही नामांतरासाठी आंदोलन करत आहोत. आता या निर्णयानंतर शिंदे सरकारनं केंद्रातून लवकर मंजुरी आणावी. त्याशिवाय आम्ही कोणताही आनंद साजरा करणार नाही. केद्रांची मान्यता मिळाल्यानंतरच आमचा जल्लोष असेल. सरकारनं एका महिन्यात मंजुरी मिळवावी, अन्यथा फिरुन देणार नाही, असा इशारीही खैरे यांनी सरकारला दिलाय.