औरंगाबादचं नवं नाव छत्रपती संभाजीनगर; शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा 

Mumbai – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागच्या सरकारने घाईगडबडीत, अल्पमतात असताना काही निर्णय घेतले होते. त्या निर्णयांचे प्रस्ताव पुन्हा एकदा सादर करायला सांगितले होते. त्यानुसार आम्ही निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) दिली आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar) , उस्मानाबादचं नाव धाराशीव (Dharashiv)असं करण्यात आलं आहे. तर नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे.

दरम्यान, नामांतराबाबत नव्या सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी सांगताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच्या ठाकरे सरकारवर टीका केली. “२९ जूनला अल्पमतातल्या सरकारने काही निर्णय घाई-गडबडीने घेतले. पुढे त्यावर कायदेशीर बाबी निर्माण होऊ नये, म्हणून हे प्रस्ताव फेरसादर करण्याचे आदेश आम्ही दिले होते, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आज नामांतरासंदर्भातल्या फेरप्रस्तावांना रीतसर मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार, औरंगाबाद शहराला छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद शहराला धाराशिव तर नवी मुंबई विमानतळाला नाव लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असं नाव देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे”, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केलं.