परभणी येथे हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चात उसळला हजारोच्या संख्येने हिंदू जनसमुदाय

परभणी/विनायक आंधळे – देशामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर लव्ह जिहाद व हिंदू मुलींचे अवैध धर्मांतरण सारख्या षडयंत्राना आळा घालण्यासाठी कठोर कायदा राज्यासह संपूर्ण भारतात लागू करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी आज परभणी (Parbhani) येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंदू धर्मरक्षण मूक मोर्चा काढण्यात आला.

‘लव्ह जिहाद व हिंदू मुलींच्या अवैध धर्मांतरणा’च्या विरोधी काढलेला हा संपूर्ण भारतातील आजपर्यंतचा पहिलाच मोर्चा होता. या मोर्चाची सुरुवात शनिवार बाजार येथून, छञपती शिवाजी महाराज रोड, छञपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, गांधीपार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे ते छत्रपती शिवाजी महराज पुतळा परिसरात हा मोर्चा पोहचला. मोर्चाच्या समारोपानंतर धर्मवीर श्री संभाजी महाराज बलिदान मास अभिवादन समितीच्या वतीने जिल्हाधिकऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात आले. मोर्चामध्ये धार्मिक, राजकीय, सामाजिक तसेच हिंदू बांधव, महिला, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.