Shivajirao Adhalarao Patil | जो विकास करतो, त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य; शिवाजीदादांची मंचरमध्ये बैठक

शिरूर लोकसभेचे (Shirur LokSabha) महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांना प्रत्येक ग्रामस्थाचं मत म्हणजे मंचरच्या विकासाला मत असल्याचा सुर मंचरच्या गावबैठकीत व्यक्त करण्यात आला. आंबेगाव तालुक्याचे सुपुत्र असलेल्या आढळराव यांना संपुर्ण पाठिंबा देण्यासाठी मंचर येथील भैरवनाथ गल्लीत बैठक पार पडली.

या बैठकीला सर्वच जातीधर्माच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली. तर उद्योजक आणि शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे आदी उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब बेंडे म्हणाले की, जो विकास करतो, त्याच्यामागे पाठीमागे ठामपणे उभे राहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यासाठी आंबेगावचे सुपुत्र आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्यासारख्या सक्षम नेत्याला निवडून देण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे.

तर अरूण लोंढे म्हणाले की, स्वकर्तृत्वान असलेले आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्याच्या विकासाचा चेहरामोहरा बदलला आहे. रामदास बाणखेले म्हणाले की, आढळराव पाटील यांनी स्वत: खासदार नसतानाही मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून विकास निधी आणल्यामुळे मंचरकर खूश राहणार असल्याचे व्ही. एस. महामुनी, सीताराम लोंडे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा