Ramdas Athawale | बिहारच्या लोकसभेच्या सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा एनडीएला पाठिंबा

Ramdas Athawale | बिहारमध्ये लोकसभेच्या सर्व 40 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) पाठिंबा असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) पटना येथे केली. रिपब्लीकन पक्षाच्या बिहार राज्य कमिटीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत बिहार राज्यात रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार लोकसभा निवडणुकीत उभे न करता सर्व 40 जागांवर एनडीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे रामदास आठवले यांनी आज जाहीर केले.

बिहारमध्ये भाजप 17 जागा लढवत आहे. जनता दल युनायटेड 16 जागा लढवत आहेत. लोक जनशक्ती पक्ष 5 जागा लढवत आहे. जीवनराम मांझी यांचा हम पक्ष 1 जागा आणि केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाहा यांचा राष्ट्रीय लोक मोर्चा पक्ष 1 जागा असे एकूण 40 जागांवर एनडीए लढत आहे.या राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएला बिहारमधील सर्व जागांवर रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा देण्यात आला असल्याचे रामदास आठवलेंनी आज अधिकृत जाहीर केले.

मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये 40 पैकी 39 जागा एनडीएने जिंकल्या होत्या. यंदा मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारच्या लोकसभेच्या सर्व 40 जागा निश्चित एनडीए जिंकेल असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला. काँग्रेसच्या इंडि आघाडीवर करेल प्रहार ते राज्य आहे बिहार असे यावेळी रामदास आठवले म्हणाले.

भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया बिहारमध्ये आहे. त्यामुळे बिहार हे आमच्या बुद्ध विहार आहे. बिहार राज्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पायाभूत सुविधांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी केंद्र सरकारने दिला आहे. बिहारचा विकास केला जात आहे. बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीएचा विजय निश्चित असल्याचा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा