नागपूरची गुलामी, ठाण्यातून गद्दारी…! चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांच्याविरोधात जोरदार बॅनरबाजी

Pune Bypoll election : चिंचवडचे राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही आहे. त्यामुळे आता चिंचवडमध्ये (Chinchwad) तिरंगी लढत होणार आहे. राहुल कलाटेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी प्रयत्न केले होते. मात्र ते निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

यातच आता  राहुल कलाटे (Rahul kalate) यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्याने त्यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.एकदम ओक्के डोक्यातून, असं त्या बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे शहरात आता या बॅनरची जोरदार चर्चा सुरु आहे. राहुल कलाटेंच्या या बंडखोरीच्या मागे भाजपचा हात असल्याचं या बॅनरच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. शिवसेना नेते संजय राऊत, सचिन आहिर, विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार सुनील शेळके यांनी राहुल कलाटेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विनंती केली होती. शिवाय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनीदेखील फोन केला मात्र राहुल कलाटे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.