पाटील आडनावाचा वाद; गौतमी पाटीलला फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारेंचा फुल्ल सपोर्ट
नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या आडनावाविषयी (Gautami Patil Surname) नवी माहिती समोर आली आहे. गौतमीच्या आडनावावरून पुण्यात चक्क बैठक पार पडली आहे. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये. अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
त्यावर गौतमी पाटील हिने आपल्या प्रतिक्रियेद्वारे आपण मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. गौतमीच्या या भूमिकेवरुन तिच्यावर टीकाही होत आहे आणि काही लोक तिच्या समर्थनार्थही बोलच आहेत. अशातच आता ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी गौतमीला पाठींबा दर्शवला आहे. भलीमोठी फेसबुक पोस्ट लिहीत त्यांनी गौतमीला समर्थन दिले आहे.
सुषमा अंधारेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी…