Sunil Tatkare | बहुजन, कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले

Sunil Tatkare | बहुजन, कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम केले

Sunil Tatkare | माझ्या बहुजन… कष्टकरी महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली उतरवण्याचे काम या मतदारसंघात केल्याचे सांगत केंद्रसरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना खेड्यापाड्यात राबवण्याचा संकल्प केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी म्हसळा तालुक्यातील पाभरे येथे महायुतीच्या जाहीर सभेत दिली.

अनेक पायाभूत सुविधा माझ्या मतदारसंघात उभारल्या आहेत आणि उर्वरितही लवकरच पूर्ण केल्या जातील. प्रत्येक समाजाने काम सांगायचे आणि सुनिल तटकरे यांनी काम केले नाही असे कधी झाले नाही असेही सुनिल तटकरे म्हणाले.

संकटे येतात ती जातपात बघून येत नाहीत. आली तर सर्वांना फटका बसतो. रायगड मतदारसंघात आलेल्या संकटकाळात इथल्या जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. अडचणीच्या काळात इथल्या जनतेला शासनाकडून कोट्यवधी रुपयांची मदत मिळवून दिल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.

दिघी बंदर अदानी यांनी घेतले आहे मात्र यापासून माझ्या कोळी बांधवांना जराही त्रास होणार नाही याची खबरदारी घेणार असल्याचा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

या मतदारसंघात सर्व धर्मांना समावेश करणार्‍या कामाची रचना केली आहे. हिंदू धर्मातील विविध सणांमध्ये मुस्लिम बांधव शुभेच्छा देतात आणि आम्ही त्यांना ईदीला शुभेच्छा देतो हा आमचा सर्वधर्मसमभाव आहे. हा आमचा कित्येक वर्षापासून सुरू असलेला भाईचारा निवडणूकीत येऊन खराब करु नका असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच

Previous Post
Sunetra Pawar | उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांचा संयुक्त दौंड दौरा, अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन

Sunetra Pawar | उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवारांचा संयुक्त दौंड दौरा, अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन

Next Post
Balasaheb Thorat | भाजपाला हद्दपार करणे हे लक्ष्य, आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे

Balasaheb Thorat | भाजपाला हद्दपार करणे हे लक्ष्य, आघाडी म्हणून साथ दिली पाहिजे

Related Posts
अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना, सुप्रिया सुळे म्हणाल्या, "मास्टरमाईंड..."

अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याची घटना, सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मास्टरमाईंड…”

Anil Deshmukh Attack | उद्या (२० नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरविणारी घटना…
Read More
महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार; झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

महाराष्ट्राला 12 पद्म पुरस्कार; झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धर व सुमन कल्याणपूर यांना पद्म भूषण

नवी दिल्ली  : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. प्रसिध्द तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण…
Read More
Neeraj Chopra Mother | "तोही माझ्या मुलासारखाच", सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानी भालाफेकपटूचे नीरज चोप्राच्या आईने केले कौतुक

Neeraj Chopra Mother | “तोही माझ्या मुलासारखाच”, सुवर्णपदक जिंकणाऱ्या पाकिस्तानी भालाफेकपटूचे नीरज चोप्राच्या आईने केले कौतुक

भारताच्या नीरज चोप्राला (Neeraj Chopra Mother) पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या भालाफेकमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने…
Read More