अजय बारसकरवर फडणवीसांच्या मंत्र्याचा हात, माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी ४० लाख घेतले – Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil vs Ajay Maharaj Baraskar: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी गंभीर आरोप केले होते. मनोज जरांगे हा खोटारडा माणूस आहे, त्याने काही गुप्त बैठका केल्या, असे अनेक आरोप अजय बारसकरांनी मनोज जरांगेंवर केले होते. त्यानंतर आता अजय बारसकरांचे सर्व आरोप फेटाळत त्यांच्यावर फडणवीसांच्या मंत्र्यांचा हात आहे, असं म्हणत मनोज जरांगेंनी हल्लाबोल केला आहे. अजय बारसकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे, असंही मनोज जरांगे म्हणालेत.

अजय बारसकर यांनी महिलेवर बलात्कार केल्याचे त्यांच्या गावातील लोक सांगत आहेत. हे ट्रॅप आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रवक्त्याचा आणि तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक बडा नेता आहे. ज्या महिलेचा विनयभंग झाला ते प्रकरण दाबलं गेलं आहे. ते प्रकरण उघडं करू नाहीतर तू जरांगेंच्या विरोधात बोल, असा दबाव त्याच्यावर आहे, असंही मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्याविरूद्ध बोलण्यासाठी बारसकरने ४० लाख रूपये घेतले, असा पलटवारही मनोज जरांगे पाटील यांनी केला.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार