शिवरायांची प्रतिमा जमिनीवर फेकली, हार फेकला; JNU मध्ये ABVP-लेफ्ट संघटना भिडल्या

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा मोठा गोंधळ सुरू झाला आहे. शिवाजी जयंतीनिमित्त (Shivaji Jayanti) अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि डाव्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद झाला. डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराजांची प्रतिमा जमिनीवर फेकल्याचा अभाविपचा आरोप आहे, तर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केल्याचा दावा डावे करत आहेत. यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप केले जात असून, विद्यापीठाकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

या संपूर्ण वादाचे अनेक फोटो अभाविपने शेअर केले आहेत. त्या चित्रांमध्ये शिवरायांचा फोटो खाली पडलेला दिसतो, फुलेही जमिनीवर विखुरलेली दिसतात. त्या फोटो सोबत ABVP ने लिहिले आहे की, JNU मधील विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात डाव्यावाद्यांनी #वीर_शिवाजींच्या प्रतिमेवरून पुष्पहार काढून तेथे लावलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांची तोडफोड करून फेकण्यात आली. अभाविप याचा तीव्र निषेध करत दोषींवर कारवाईची मागणी करत आहे.

अभविप सचिवांनी जेएनयू प्रशासनाला विनंती केली आहे की आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यापीठातील वातावरण बिघडवण्यापासून बदमाशांना थांबवावे. आम्ही जेएनयू प्रशासनाला विनंती करतो की आरोपींवर कठोर कारवाई करावी. आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी बेकायदेशीर विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश करण्यापासून आणि उपद्रव निर्माण करण्यापासून रोखावे. या लोकांना विद्यापीठाचे नाव खराब करण्यापासून रोखले पाहिजे.