गरजूंचा ‘मसीहा’ सोनू सूदने उलगडले गुपीत, सांगितले कुठून आणतो लोकांच्या मदतीसाठी इतके पैसे

Mumbai: सोनू सूद (Sonu Sood) हा आजच्या काळात केवळ अभिनेता म्हणून ओळखला जात नाही, तर कोरोनाच्या काळात तो ज्या प्रकारे गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला, त्यामुळे लोक त्याला ‘मसीहा’ म्हणू लागते आहेत आणि देवाचा दर्जा देऊ लागले आहेत. देशभरातील लोक सोनू सूदचा खूप आदर करतात. अलीकडेच अभिनेता ‘आप की अदालत’ या शोमध्ये दिसला होता. या कार्यक्रमात सोनू सूदने मोठा खुलासा केला आहे.

रजत शर्माने त्याला विचारले की, लॉकडाऊनच्या काळात इतके मजूर आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यासाठी पैसे कुठून आणले? सोनू सूदने या प्रश्नाचे दिलेले उत्तर ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

काय म्हणाला सोनू सूद?
या प्रश्नाचे उत्तर देताना सोनू सूद म्हणाला, ‘जेव्हा मी हे सर्व सुरू केले, तेव्हा मला माहित होते की लोकांची मागणी ज्या पातळीवर येत आहे, तुम्ही दोन दिवसही टिकू शकणार नाही. मी विचार केला की यात कशी भर घालायची. मग मी ज्या ब्रँडवर काम करत होतो; ते सर्व चॅरिटीसाठी वापरले होते. या कामासाठी मी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, कॉलेज, शिक्षक, फार्मास्युटिकल कंपन्यासोबत सामील झालो. मी म्हणालो, मला माझा ब्रँड लुक हवा आहे, मी फुकट काम करेन, असे म्हणून ते जॉईन होत राहिले आणि काम आपोआप झाले.’

पुढे तो म्हणाला, ‘काही मोठ्या एनजीओने मला बोलावले, सांगितले की सोनू देशाची 130 कोटी लोकसंख्या आहे, तू असे जगू शकणार नाहीस. मी म्हणालो, माझ्या घराखाली येणाऱ्यांना मी नकार देऊ शकत नाही. आज जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत, कोणत्याही लहान जिल्ह्यात किंवा लहान राज्यात, कोणीही, कुठेही, तुम्ही बोलू शकता. मी कोणाला शिकवू शकतो, मी कोणाला उपचार मिळवून देऊ शकतो, मी कोणाला नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्ही मदतीसाठी कॉल कराल तर मला शक्य होईल तितकी मी मदत करेल.’

सोनू सूद कोरोनाच्या काळात सोशल मीडियाद्वारे ते त्याच्या घरी आलेल्या गरजूंपर्यंत सर्वांच्या मदतीसाठी मसिहा म्हणून पुढे आला होता. आजही तो सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोकांशी जोडलेला आहे. ‘आप की अदालत’ या शोमध्ये सोनू सूदने असेही सांगितले की, त्याने त्याचे सोशल मीडिया अकाउंट हाताळण्यासाठी कोणतीही टीम ठेवली नाही, उलट तो स्वतः सर्व ट्विटला उत्तर देतो.