पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चेत असणारे सुनील देवधर यांची Exclusive मुलाखत

पुणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक दिग्गज ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून या सर्वांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. देवधर यांच्या एन्ट्रीमुळे त्यांच्याच पक्षातील नेते अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर सुनील देवधर यांनी आझाद मराठीला मुलाखत दिली असून त्यांनी या निवडणुकीवर, उमेदवारीवर भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली आहे. सुनील देवधर यांना वरिष्ठांनी पुण्यातून निवडणूक लढवण्यास दिला ग्रीन सिग्नल मिळाला आहे का ? सुनील देवधर स्वतः पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत का ? पुण्याबद्दल त्यांचे व्हिजन काय आहे गिरीश बापट – सुनील देवधर यांचे संबंध कसे होते ? पक्षातील प्रतिस्पर्धी लोकसभेच्या उमेदवारीवरील दावा सोडतील का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मुलाखत जरूर पहा.