जाहीर सभांमध्ये उद्धव ठाकरेंचा बाप काढणाऱ्या सुषमा अंधारे शिवसेनेत प्रवेश करणार

मुंबई : प्रा. सुषमाअंधारे(Sushma Andhare) या शिवसेनेत( Shiv Sena) जाहीर प्रवेश करणार आहेत. सुषमा अंधारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या प्रचार सभांमध्ये सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवरही सातत्याने निशाणा साधला होता.

28 जुलै रोजी दुपारी 12 वाजता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अडचणीच्या काळात शिवसेनेच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय मी घेतला असून यासाठी मी शिवसेनेत जाहीर प्रवेश करत असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगीतले.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. राष्ट्रवादीच्या त्या स्टार प्रचारक होत्या. जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती.