दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उम्रान मलिकला संधी

नवी दिल्ली- IPL 2022 नंतर, टीम इंडियाला 5 सामन्यांच्या T20 मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. या मालिकेची खूप प्रतीक्षा होती कारण आयपीएलमध्ये कामगिरी करणाऱ्या कोणत्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये स्थान दिले जाते याकडे जगाचे लक्ष लागले होते. आता बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

केएल राहुलची कर्णधारपदी निवड   दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. हा अतिशय आश्‍चर्यकारक निर्णय आहे कारण या मालिकेत शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या यांची कर्णधार म्हणून निवड केली जाऊ शकते, असे सुरुवातीपासूनच मानले जात होते. पण तसे झाले नाही. या संघात धवनलाही संधी देण्यात आलेली नाही.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ –  केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार/(विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार.