विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरणाऱ्या जयंत पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई

Nagpur – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन कालावधीत निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना अपशब्द वापरल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना निलंबित करण्याची मागणी सत्ताधारी गटातील सदस्यांनी केली होती. या संदर्भात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांसदर्भात अपशब्द वापरल्याचा आरोप सत्ताधारी गटातील सदस्यांनी केला आहे.(Suspension action against Jayant Patil for using abusive words on the Assembly Speaker)

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन झालं.निलंबनाची कारवाई केल्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहाचा त्याग केला. यानंतर विरोधकांकडून देखील दिलगिरी व्यक्त करत सभात्याग करण्यात आला.