मलीकांचा राजीनामा घ्यायची पवारांची हिम्मत होईना; खाती काढून घेतली पण तरीही मंत्रीपदी  कायम 

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी गुरुवारी रात्री उशीरापर्यंत सुरु असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीमध्ये एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडललेल्या या बैठकीत सध्या संक्तवसुली संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या ताब्यात असणाऱ्या नवाब मलिक यांच्याकडून अल्पसंख्यांक मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आलाय.

नवाब मलिक यांच्या खात्याचा पदभार हा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर गोंदियाच्या पालकमंत्रिपदी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (prajakt tanpure) यांची निवड करण्यात आली आहे.

नवाब मलिक उपलब्ध नसल्यानं  2 नवे मुंबई कार्याध्यक्ष दिले जाणार आहे.  नरेंद्र राणे आणि राखी जाधव ह नवे अतिरिक्त कार्याध्यक्ष असणार आहे.  नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्यानं त्यांची जबाबदारी तात्पुरती दिली जाणार आहे.  दरम्यान, नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नसला तरी राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे ते बिनखात्याने मंत्री झालेत.