या धनंजय मुंडेला जंगलात पाठवा तो पिसळलाय, निलेश राणेंचा प्रहार

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत आपण उतरणार असल्याची घोषणा करुणा मुंडे यांनी केली आहे. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी करुणा मुंडे पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच धनंजय मुंडेंचा उल्लेख करत अनेक गंभीर आरोप केले.

करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे असल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. “धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या”, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला.

यावरून आता भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी धनंजय मुंडे याना जोरदार टोला लगावला आहे. ‘धनंजय मुंडे ला स्वतःची IPL टीम बनवायची आहे वाटतं… मुंडे 11. हिंदूचे कायदे धनंजय मुंडे ला लागू होत नाही का?? ह्याची आमदारकी पण रद्द होते कारण याने निवडणुक आयोगाला खोटी माहिती दिली, त्यांनी स्वतः मान्य केले आहे. याला जंगलात पाठवा, पिसळलाय.’ असा प्रहार निलेश राणे यांनी केला आहे.