२६/११ हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाला लवकरच अमेरिकेतून भारतात आणले जाण्याची शक्यता

Mumbai Terror Attack: मुंबईत २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा आरोपी तहव्वूर हुसेन राणा याला लवकरच भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. अमेरिकन कोर्टाने तहव्वूर हुसेन राणा याचे अपील फेटाळले आहे, ज्यामध्ये तो अमेरिकन सरकारला भारतात पाठवू नये अशी विनंती करत होता.

अमेरिकन कोर्टाने त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर त्याला भारतात आणण्यासाठी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तहव्वूर हुसेन राणा हा मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा आरोपी आहे.

दरम्यान, यूएस सरकारचे उप प्रवक्ते वेदांत पटेल यांनी म्हटले आहे की अमेरिकेचे सरकार संपूर्ण जगात दहशतवादाच्या विरोधात आहे. भारतात २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. असे घडायला नको होते. अमेरिका नेहमीच दहशतवाद करणाऱ्यांच्या विरोधात राहिली आहे. दहशतवादाविरोधातील सर्व आरोपींना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे.