Teacher’s day : राष्ट्रनिर्माणाचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनी सन्मान

Hemant Rasane – भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा केली जाते. आपल्या सर्वांच्या जीवनात गुरुचे महत्व अनन्यसाधारण आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. नव्या पिढीला घडवत असताना शिक्षक हे राष्ट्रनिर्माणाचे महान कार्य करत असतात. याच भावनेतून शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी, कसबा मतदार संघात ५० पेक्षा अधिक शाळांमध्ये सन्मानपत्र देत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

मतदारसंघातील जवळपास ३३५० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कसबा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख   हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी बोलताना रासने म्हणाले की, जगातील सर्व मोठे थोर व्यक्ती हे कधीना कधी विद्यार्थी होते. त्यांनी सुध्दा शिक्षण घेतले आहे. त्यामुळे शिक्षक या जगातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहेत. आपल्या भारत देश आर्थिक महासत्तेत आज ५ व्या क्रमांकावर आहे आणि येणाऱ्या काळात तो ३ ऱ्या क्रमांकावर येईल आणि या सगळ्यात शिक्षकांचं मोठ योगदान असणार आहे. कारण ते उद्याचे भविष्य असणारे विद्यार्थी घडवत आहेत.

यावेळी माजी नगरसेवक राजेश येनपुरे, अजय खेडेकर, योगेश समेळ, मनीषाताई लडकत, गायत्री खडके, आरती कोंढरे, मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, सरचिटणीस राजेंद्र काकडे, छगन बुलाखे, रानीताई कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित कंक, प्रभाग अध्यक्ष किरण जगदाळे, उमेश दुरांडे, संदीप इंगळे, रमेश जगताप, सागर शिंदे, अर्जुन खानापुरे तसेच संजय मामा देशमुख,निलेश कदम,राजू परदेशी, नामदेव माळवदे, चंद्रकांत पोटे, प्रणव गंजीवाले, बिपिन बोरावके, सोहम भोसले, अमित गोखले, तुषार रायकर, विश्वास घोलप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्याः

हे तर एखाद्या शेंबड्या पोरालाही पटणार नाही; जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल
देशात शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचं मोठं संकट, चुकीच्या लोकांकडे देशाचे नेतृत्व गेलेले आहे- शरद पवार
देश व लोकशाही वाचवण्याची लढाई केवळ काँग्रेसची नाही तर आपल्या सर्वांची: नाना पटोले
राज्यातील येड्याच्या सरकारने वीज महाग केली आहे, शेतीला आठ तासही विज मिळत नाही – Nana Patole