जिंकणारा उमेदवार हा फक्त जोशुआच असल्याने त्यालाच मत द्या – तेजस्वी सूर्या

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून अनेक बडे नेते गोव्यात प्रचारासाठी हजेरी लावत आहे.

आज ( ११ फेब्रुवारी ) म्हापसा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांच्या प्रचार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी जोशुआ डिसोझा यांच्या कामाचे तोंडभरून केले. तर, जोशुआच्या रूपाने एक युवा उमेदवार भाजपने दिला आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्याला निवडून आणावं आणि आपण म्हापसा जिंकरणारच याचा मला विश्वास आहे. असं तेजस्वी सूर्या म्हणाले आहेत.

दरम्यान, तेजस्वी सूर्या यांनी गोव्यात निवडणूक लढवणाऱ्या इतर पक्षांवर जोरदार प्रहार केला आहे. गोव्यात निवडणूक लढवणारे इतर पक्ष हे फक्त राजकीय पर्यटक आहेत ते मत खाण्यासाठी येथे आले आहेत. त्यांच्याकडे काहीच व्हिजन नाही त्यांना देखील चांगलं माहीत आहे आपण जिंकणार नाही. आसा घणाघात तेजस्वी सूर्या यांनी काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर केला आहे. शेवटी जो पक्ष जिंकणार त्यालाच मत द्या आणि जिंकणारा उमेदवार हा फक्त जोशुआच आहे. असे आवाहन तेजस्वी सूर्या यांनी म्हापसा आणि गोव्यातील युवकांना केले आहे.