दंगलीच घडवायच्या तर आधी आदित्य ठाकरेंच्या हातामध्ये दगड द्या, इतरांच्या खांद्यावर बंदूक कशाला? 

मुंबई : प्रभादेवी परिसरात शिंदे गट आणि शिवसेनेत झालेल्या राड्यानंतर आता (Political differences) आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.यातच आता किरण पावसकर (kiran Pavaskar) यांनी उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे. आतापर्यंत शिवसैनिकांच्या जीवावर ठाकरेंनी आपला हेतू साधला होता. आता दंगलीच घडवायच्या असतील तर आधी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या हाताममध्ये दगड द्या असे थेट अव्हानच किरण पावसकर यांनी दिले आहे.

रस्त्यावर उतरायचे शिवसैनिकांनी आणि यांच्या लेकरांनी एकतर घरात किंवा हॉटेलमध्ये पार्टी करीत बसायचे. आतापर्यंत हेच सुरु होते. खोटे आरोप करुन दंगलीच घडवून आणायच्या असतील तर आधी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या दगड द्या अन् रस्त्यावर उतरवा असा सल्लाच पावसकर यांनी पक्ष प्रमुखांना दिला आहे. गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल होऊ द्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हीच त्यांची परंपरा असल्याचा घणाघात पावसकर यांनी केला आहे.