…तर त्यांना आम्ही राजकीय श्रद्धांजली वाहतोय, संजय राऊत यांची जळजळीत टीका

पंढरपूर – विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवेसेनेत प्रवेश केला. दरम्यान, हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. विकासाच्या मुद्द्यावर मी शिंदे गटात येण्याचा निर्णय घेतला आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या. अनेक निष्ठावंत साथ सोडत असल्याने ठाकरे गटात चिंतेचे वातावरण आहे. मात्र एवढे सगळे होऊन देखील खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच आहे.

लाज वाटते मला. पाचवेळा आमदारकी दिली. अजून चालू आहे. त्यांच्यात थोडी जरी नैतिकता असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. त्यांना आतापर्यंत मिळालेलं प्रत्येक वैधानिक पद फक्त शिवसेना आणि ठाकऱ्यांमुळेच मिळालं. पाच पाच वेळा ज्यांना आमदारकी मिळाली, महिला आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद त्यांना सुरुवातीला मिळालं. विधान परिषदेचं उपसभापतीपद दिलं. एवढं दिल्यानंतरही एखादी व्यक्ती पक्ष सोडून जात असेल, कारणं काही असेल… विकास असेल, अन्याय असेल. तर मला त्यांची लाज वाटते.

महाराष्ट्रालाही त्यांना लाज वाटते. ज्या विचारसरणीतून त्या आल्या तरीही त्यांना जे जे हवं ते दिलं. पण चारपाच महिन्यासाठी कुणी पद राहावं म्हणून कोणी अशा प्रकारची बेईमानी करत असतील तर त्यांना आम्ही राजकीय श्रद्धांजली वाहतोय, अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली.