दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकास होणार

मुंबई: भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समिती सदस्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दक्षिण मुंबईतील ३० वर्ष जुन्या म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जाहीर करण्यात आला. याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात खा. राहुल शेवाळे, भाजपा म्हाडा सेल व म्हाडा संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पार पडली.(The 30-year-old MHADA buildings in South Mumbai will be redeveloped)

मुंबईकरांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवत या पुनर्रचित इमारतीतील रहिवाश्यांना न्याय दिला आहे. या बैठकीत ३३ (२४) कलमात आवश्यक त्या सुधारणा करुन एक आठवड्यात अध्यादेश जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी तशाप्रकारचे निर्देश बैठकीमध्ये उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. या निर्णयामुळे दक्षिण मुंबईतील सुमारे ३८८ इमारतीतील ५०,००० कुटुंबाना मुख्यमंत्र्यानी न्याय देवून त्यांच्या घराचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. याबद्दल  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया भाजपा मुंबई म्हाडा सेलचे मिलिंद तुळसकर यांनी दिली. या बैठकीला दक्षिण मुंबई अध्यक्षा विनिता राणे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.