चिंचवड : नाना काटेंनी नामनिर्देश पत्र विकत घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या 

Pune : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर पोटनिवडणुक होत असून बंडखोरी ही या निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी डोकेदुखी ठरू शकते अशी चर्चा आहे.

दरम्यान, चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) लढणार आहे. राष्ट्रवादीकडून चिंचवड शहरातील काही नावांची जोरदार चर्चा सुरू होती. त्यात नाना काटे (Nana Kate) यांचंदेखील नाव होतं. मात्र राष्ट्रवादीची पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच नाना काटे अर्ज विकत घेतला आहे. नाना काटे यांनी अर्ज विकत घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.