छगन भुजबळ यांनी सरस्वतीचा फोटो लावायला विरोध केला आहे यावर पेंग्विन सेनेच काय मत?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘शाळेत शारदा, सरस्वती मातेचा फोटो का ? ज्या मातेला आम्ही कधी पाहिलं नाही. कधी आम्हाला शिकवलं नाही. शिकवलं असेल तर केवळ तीन टक्क्यांना शिकवलं. आम्हाला दूर ठेवलं. त्यांची पूजा कशासाठी करायची ? देशातील महापुरूष तुमचे देव असले पाहिजे. देशात महापुरूषांच्या विचारांची पूजा झाली पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले.

देवी सरस्वतीला कुणी पाहिले आहे का? पाहिले असेल तरी फक्त 3% लोकांना सरस्वती देवीने शिकवलं असेल असं म्हणत भुजबळ यांनी जातीयवादी फुत्कार सोडले. शाळेत सरस्वतीचा फोटो का पाहिजे? शाळांमध्ये फुले, आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटलांचे फोटो लावा अशी मागणीही भुजबळांनी केली. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा जातीयवादी चेहरा समोर आला असून या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली आहे.

भाजप नेते आणि प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या मुद्द्यावरून शिवसेना आणि भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले, राम अस्तित्वात नाही असे प्रतिज्ञापत्र दाखल करणाऱ्या कॅाग्रेसनंतर आता छगन भुजबळ यांनी सरस्वतीचा फोटो लावायला विरोध केला आहे. कॅाग्रेस राष्ट्रवादी तर कायम हिदुत्वविरोधी आहेत. त्यांचा मांडीला मांडी लावून बसणाऱ्या पेंग्विन सेनेच काय मत? उध्दव ठाकरे राष्ट्रवादीचा निषेध करणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.