काश्मिरी पंडित आणि लिंचिंगवर वक्तव्य करणाऱ्या साई पल्लवीच्या अडचणी वाढल्या; एफआयआर दाखल

हैद्रबाद – साऊथ इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी (Actress Sai Pallavi) जरी तिचे चित्रपट, डान्स आणि साधेपणामुळे चर्चेत राहिली असली तरी यावेळी ती अभिनेत्री तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. पल्लवीच्या एका वक्तव्यावरून खळबळ उडाली असून, परिणामी अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बजरंग दलाने साई पल्लवीविरुद्ध एफआयआर दाखल केला (Bajrang Dal has registered an FIR against Sai Pallavi) आहे, ज्याची प्रत बजरंगदल भाग्यनगरच्या ट्विटर अकाउंटवरही शेअर करण्यात आली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मीडिया मुलाखतीदरम्यान साई पल्लवीने म्हटले आहे की, ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटात काश्मिरी पंडितांचे हत्याकांड दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे, हिंसाचार आणि धर्म या तराजूत तोलला गेला, तर काही काळापूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून जय श्री राम म्हणण्यास सांगितले होते. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे ते सांगा. पल्लवीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

बजरंग दल भाग्यनगर नावाच्या ट्विटर हँडलवर एफआयआरची एक प्रत शेअर करण्यात आली आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीविरोधात तक्रार दाखल करणाऱ्यांची नावेही लिहिली आहेत.