Urfi Javed Viral Video: डोक्यावर पदर हातात आरती.. उर्फी पोहचली बाप्पाच्या चरणी

Urfi Javed Visits Lalbaughcha Raja: मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेला लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) जगभरात ख्याती आहे. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या राजाच्या दर्शनसाठी देशभरातून भक्तांची रांग लागते. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचली आहे. उर्फीचा बाप्पांचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल (Urfi Javed Viral Video) होत आहे.

उर्फी जावेद मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी अनवाणी पोहोचली आहे. यावेळी उर्फीने पीच कलरचा सूट परिधान केला होता. तिने डोक्यावर ओढणी घेतली आहे. हातात पुजेचे ताट घेऊन तिने गणरायाची आरतीही केली. ती बाप्पाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाली. यापुर्वी तिने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले आणि आता ती गणरायाचा आशीर्वाद घेताना दिसली. तिचा बाप्पांचे दर्शन घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’