मुंबई केंद्रशासित करण्याचं कुणाच्या मनात नाही, या विषयाला कायमचा पूर्णविराम द्या; आत्मचरित्रात पवारांची भूमिका

मुंबई- ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक राजकीय विषयांवर उलगडे केले आहेत. महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) निर्मिती कशी झाली इथपासून ते बरेचसे राजकीय किस्से शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहेत. याच आत्मचरित्रात ठाकरे गटाची कोंडी करणारा एक मजकूर आहे.

मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असं पवारांनी पान क्रमांक ४१७ वर लिहिलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांची (Sanjay Raut) चांगलीच कोंडी झाली आहे. कारण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप स्वतः ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं करत असतात.