लाच घेताना लेडी इन्स्पेक्टरला रंगेहाथ पकडलं ; म्हणाली, यातून वरिष्ठांनाही पैसे द्यावे लागतात

जयपूर – राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराचे एक प्रकरण समोर आले आहे, जे जाणून तुम्हालाही धक्का बसेल. जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका लेडी ड्रग इन्स्पेक्टरला 5000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. अटकेत असलेल्या लेडी इन्स्पेक्टरचे नाव सिंधू कुमारी असे आहे. एसीबीचे पथक लेडी ड्रग इन्स्पेक्टरच्या घरासह इतर ठिकाणी तपास करत आहे.

जयपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक बीएल सोनी यांनी सांगितले की, एसीबीच्या विशेष पथकाकडे या प्रकरणाची तक्रार आली होती. सिंधू कुमारी ड्रग इन्स्पेक्टर (औषध निरीक्षक) यांना त्यांच्या मेडिकल स्टोअरमध्ये केलेल्या तपासणीच्या अहवालात कोणतीही कमतरता  आढळून आली नसताना देखील औषध नियंत्रण संस्थेच्या वतीने 10,000 रुपयांची लाच मागून त्रास दिला जात असल्याचे दुकान मालकाने सांगितले. दुकान मालकाच्या तक्रारीची पडताळणी करून अतिरिक्त पोलीस अधीक्षक बजरंगसिंग शेखावत यांच्या पथकाने औषध निरीक्षकाला ₹5000 ची लाच घेताना अटक केली. त्याला अटक होताच ड्रग इन्स्पेक्टरने ठणकावून सांगितले की, हेपैसे केवळ माझ्या एकट्याचे नाहीत, तर यातून मला वरपर्यंत पैसे द्यावे लागतात असा दावा देखील तिने केला आहे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरकार स्थापन होताच भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र भ्रष्टाचाराची रोज प्रकरणे समोर येत आहेत.  सरकारी खात्यात भ्रष्टाचाराचा कसा उघड खेळ सुरू आहे, हे लेडी ड्रग इन्स्पेक्टरच्या बोलण्यातून पुर्णपणे स्पष्ट होत आहे.