Madhavi Joshi | माधवी जोशी यांना वंचितने मावळमधून दिली उमेदवारी

Madhavi Joshi | वंचित बहुजन आघाडीची लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर झाली असून पक्षाच्या एक्स हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. यात मावळ मतदारसंघातून माधवी जोशी (Madhavi Joshi) यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिरुरमधून आफताब अन्वर मखबुल शेख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. आजच माधवी जोशी यांनी वंचित बहुजन आघडीचे राज्य उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांच्या उपस्थितीत वंचितमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांची लोकसभा निवडणुकीसाठी वर्णी लागणार अशी चर्चा होती. मात्र, मतदारसंघ कोणात असणार, याबाबत कोणालाच माहिती नव्हती. पण, मावळमधून त्यांना उमेदवारी दिल्यामुळे या चर्चेला विराम लागला.

तसेच, शिरुरच्या जागेचा पण उमेदवार ठरायचा होता, त्यामुळे सर्वांना या ठिकाणी वंचित कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता होती. आज शिरुरमधून आफताब अन्वर मखबुल शेख यांना उमेदवारी देऊन, शिरुरच्या मतदारसंघात वंचितने स्पर्धा वाढवली असल्याची चर्चा आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Archana Patil | अर्चना पाटील यांच्या विजयासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत सर्वतोपरी प्रयत्न

Omraje Nimbalkar Vs Archana Patil: धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व अर्चना पाटील यांची संपत्ती किती?

Uddhav Thackeray | फडणवीस म्हणाले होते आदित्यला मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो अन् मी दिल्लीला जातो; ठाकरेंचा दावा