हद्द झाली : विमानात चोरून तंबाखू खाणाऱ्या काकांचा व्हिडीओ होतोय व्हायरल

व्यसन ही अशी गोष्ट आहे जी कधीही सहज बदलता येत नाही. एखाद्या गोष्टीची सवय करायला जसा वेळ लागतो तसाच ती मोडायलाही वेळ लागतो. आम्ही असे म्हणत आहोत कारण असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एक काका फ्लाइटमध्येच चोरून तंबाखू (Tobacco) खाताना (Viral Video) दिसत आहेत.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप लोकप्रिय झाला आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्हीही शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लोक फ्लाइटमध्ये बसलेले दिसतील. इतक्यात एक काका चोरून तंबाखू खाताना दिसतात. यानंतर, ते मास्क घालून प्रवासाचा आनंद घेऊ लागतात. काकांना तंबाखू खाताना पाहिल्यानंतर लोकांनी एकापेक्षा एक कमेंट केल्या आहेत.