भारतीय जनता पार्टी पुणे शहर महिला आघाडीच्या वतीने रविवारी नमो वॉकेथॉनचे आयोजन

Namo Walkethon:- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा पुणे शहर यांच्या वतीने दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी नमो वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले असून त्या संदर्भात माहिती अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत फर्ग्युसन महाविद्यालय या ठिकाणी या नमो वॉकेथॉनचा शुभारंभ होईल. ही वॉकेथॉन फर्ग्युसन कॉलेजच्या गेट नंबर ३ पासून सुरू होवून घोले रोड , बालगंधर्व रंगमंदिर, डेक्कन जिमखाना येथून पुन्हा फर्ग्युसन महाविद्यालय असा या वॉकेथॉन चा मार्ग असेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ५ महिलांना जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती सौ.फरांदे यांनी दिली.या पत्रकार परिषदेला सरचिटणीस प्रियांका शेंडगे, गायत्री खडके. आरती कोंढरे ,उज्वला गौड,भावना शेळके, खुशी लाटे, प्रेरणा तुळजापूरकर आदी उपस्थित होत्या.

महत्वाच्या बातम्या-

Bhalchandra Nemade: वाल्मिकीचा राम खरा कसा म्हणायचा? नेमाडे पुन्हा बरळले

असीम सरोदे यांना ठाकरेंनी नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट द्यावे; मातब्बर नेत्याची मागणी

सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, नितीन गडकरी …