आता ट्विटरवरून यूजर्स कमावू शकणार पैसे, एलॉन मस्कने लॉन्च केलाय ‘अ‍ॅड्स रेव्हेन्यू शेअरिंग’ प्रोग्राम

Twitter Ads Revenue Sharing: ट्विटरने कंटेट क्रिएटर्ससाठी नवीन जाहिरात रेवेन्यू शेयरिंग प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केली आहे. या प्रोग्रामद्वारे कंटेट क्रिएटर्स त्यांच्या कंटेटद्वारे कमाई करू शकतील आणि उत्पन्न मिळवू शकतील. या संदर्भात कंपनीने आपल्या वेबसाइटवर तपशीलवार माहिती देखील दिली आहे. उल्लेखनीय आहे की कंपनीचे मालक एलोन मस्क यांनीही गेल्या महिन्यात यासंदर्भात माहिती दिली होती.

मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “X/Twitter निर्मात्यांना त्यांच्या रिप्लायमध्ये दाखवलेल्या जाहिरातींसाठी पैसे देण्यास सुरुवात करेल. पहिले ब्लॉक पेमेंट $5 दशलक्ष आहे.”

कंपनीने त्यांच्या ‘क्रिएटर जाहिराती महसूल शेअरिंग’ पेजवर म्हटले आहे की, “आम्ही निर्मात्यांसाठी जाहिरातींचे महसूल सामायिकरण समाविष्ट करण्यासाठी आमची निर्माते कमाई ऑफर वाढवत आहोत. याचा अर्थ असा की निर्मात्यांना त्यांच्या पोस्टच्या प्रत्युत्तरांसह जाहिरात कमाईचा वाटा मिळू शकतो. लोकांना थेट ट्विटरवर उदरनिर्वाहासाठी मदत करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.”

ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रोग्राम सर्व देशांमध्ये उपलब्ध करून दिला जाईल जेथे स्ट्राइप पेआउटसाठी सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनी व्यवस्थापनाने सांगितले की आम्ही प्रारंभिक गट सुरू करत आहोत ज्याला पेमेंट स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले जाईल.