Department of Meteorology | राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता; हवामान विभागानं दिला इशारा

भारतीय हवामान विभागाने ( Department of Meteorology) वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या पूर्व आणि मध्य भागात तसेच भारतीय द्विपकल्पात पुढील चार दिवस वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि विदर्भ प्रांतात, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगेचं खोरं आणि ओडिशामध्ये येत्या 11 तारखेपर्यंत वादळ, विजांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. या काळात ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान खात्यानं (Department of Meteorology) व्यक्त केला आहे. ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज आणि उद्या गारपिटीची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात आजपासून पुढील तीन दिवस वीजा, गारा आणि जोराचे वारे यांच्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Har Ghar Modi Parivar Abhiyan | दहा लाख मतदारांपर्यंत पोहोचला ‘मोदींचा नमस्कार’

Shivajirao Adhalrao Patil | ‘जुन्नरमधून शिवाजीदादांना सर्वाधिक मते पडणार’, आमदार अतुल बेनकेंनी व्यक्त केला विश्वास

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार महिला शक्ती !