मराठा आरक्षण संदर्भात गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मुंबईत- चंद्रकांत पाटील

Maratha Reservation : मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सोमवार दि. 30 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी १० वाजता मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या दालनात आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी माहिती दिली.

या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्‍याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपध्‍दती विहित करण्‍यासाठी न्‍यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्‍त) यांच्या अध्‍यक्षतेखाली गठित केलेल्या समितीने आतापर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. असेही मंत्री तथा मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

‘मुस्लीम मुलांना महाविद्यालयात जायला वेळ नसतो मात्र जुगार खेळण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी वेळ असतो’

ज्यांचे पोट रिकामे आहे अशा गोरगरीब जनतेला आरक्षण द्या – Ramdas Kadam

मी ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली खंत