Hardik Pandya | तेलही गेलं अन् तूपही गेलं.. बीसीसीआयचा हार्दिक पांड्याला दणका

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. आयपीएलच्या या मोसमात मुंबई इंडियन्सचा स्लो ओव्हर रेटचा हा तिसरा गुन्हा होता आणि यामुळे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे आणि 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुढील मोसमातील पहिला सामना तो खेळू शकणार नाही. वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध त्याचा संघ वेळेवर षटके पूर्ण करू शकला नाही. हा सामना मुंबईसाठी आयपीएल 2024 मधील शेवटचा सामना होता. याचा अर्थ हार्दिक पुढील मोसमातील पहिला सामना खेळू शकणार नाही. हार्दिक (Hardik Pandya)पुढील हंगामासाठी दुसऱ्या संघात गेला तर तो त्या विशिष्ट संघाचा पहिला सामना खेळू शकणार नाही.

आयपीएलच्या या मोसमात मुंबईला किमान ओव्हर रेट राखण्यात अपयशी ठरण्याची ही तिसरी वेळ होती. परिणामी, एका सामन्याच्या बंदीच्या व्यतिरिक्त, हार्दिकला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आणि प्रभावशाली खेळाडूंसह उर्वरित खेळणाऱ्या बारा जणांना वैयक्तिकरित्या 12 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला.

आयपीएल मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे की, “मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला वानखेडे स्टेडियमवर 17 मे रोजी आयपीएल 2024 मध्ये लखनऊ सुपरजायंट्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान स्लो ओव्हररेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.” त्यात म्हटले आहे की, “आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटचा हा मुंबई इंडियन्सचा तिसरा गुन्हा होता, त्यामुळे हार्दिक पांड्याला 30 लाख रुपयांचा दंड आणि पुढील सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप