“…अन्यथा ललित पाटीलला पोलीस बनावट चकमकीत मारतील”, रवींद्र धंगेकरांचं वक्तव्य 

Lalit Patil – ड्रग्ज माफिया ललित पाटील सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. अंमली पदार्थांप्रकरणी पोलीस तपासात रोज नवनवीन माहिती समोर येतेय.  दुसऱ्या बाजूला ललित पाटीलच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप देखील करताना पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, यातच आता अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी होण्यासाठी हा तपास केंद्रीय यंत्रणांकडे देणे योग्य आहे. अन्यथा पोलीस बनावट चकमकीत त्याला मारून टाकतील, असा आरोप कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर (Rabindra Dhangekar MLA of Kasba Assembly Constituency) यांनी सोमवारी केला.
ते म्हणाले की, ससून रुग्णालयातील एक शिपाई हा आरोपी ललित पाटील आणि एका मंत्र्यामधील दुवा होता. त्यामुळे या प्रकारची चौकशी झाली पाहिजे. आरोपी पाटील याची पंचतारांकित हाॅटेलमध्ये बडदास्त ठेवली जात होती. ललित ससूनमधून अमली पदार्थांची विक्री करत होता. पोलिसांची साथ असल्याने हा प्रकार झाल्याने केंद्रीय यंत्रणेमार्फत त्याचा तपास होणे आवश्यक आहे. या प्रकरणात सरकारमधील तीन मंत्र्यांचा समावेश असल्याची चर्चा असून, तपासाची दिशा बदलण्यात आली आहे. असं धंगेकर यांनी म्हटले आहे.

https://www.youtube.com/watch?v=52bkac9xyp8&t=2s

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ